corona case : कोरोनाने वाढवली धाकधूक, राज्यात तीन रुग्णांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच राज्यात कोरोनाचे तीन बळी गेल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.;
कोरोनाच्या (Corona) पहिल्या तीन लाटांनंतर कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला होता. मात्र आता पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने टेन्शन वाढवले आहे. त्यातच पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 562 इतकी असून 3 कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. त्याबरोबरच राज्यात H3N2 सारख्या विषाणूचे रुग्णही आढळत आहे. त्यांची संख्या 365 इतकी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे.
मुंबईत 172 रुग्ण
कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच मुंबईत (mumbai) १७२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात रविवारी ५६२ नवे रुग्ण आढल्याने पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. त्याबरोबर बाधितांची संख्या ११ लाख ५४ हजार ४५४ इतकी आहे. पण १२३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यातच ११ लाख ३६ हजार ६३६ रुग्ण बरे झाल्याची दिलासादायक बाब आहे. मात्र सध्या मुंबईत 1 हजार 70 रुग्ण उपचार घेत आहेत.