माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मागच्या काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेस केल्यानंतर नुकतंच त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर काँग्रेस पार्टीचे नाव (INC) काढून टाकलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या प्रोफाईल वरची बॅकग्राउंड कव्हर असलेली फोटो बदलून त्याऐवजी आता भाजपमध्ये प्रवेश करताना भाजप नेत्यांसोबत काढलेली फोटो लावलेली आहे.
एक्स हँडलवर आज घडीला त्यांचे एकुण 399k म्हणजेच 3 लाख ९९ हजार इतके फॉलोअर्स आहेत. त्यांचा काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश झाल्याने त्यांच्या एक्स हँडल्स फॉलोर्सवर याचा परिणाम झालेला नाही असे दिसते.