खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास NIAने का सुरू केलेला नाही, असा सवाल काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत उपस्थित केला आहे. दीव दमणमधून सातवेळा खासदार असलेल्या मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. डेलकर हे गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या जवळचे होते. त्यांनी दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. पण ना एनआयएने ना मीडियाने या घटनेची दखल घेतली. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, डेलकर यांनी महाराष्ट्रात येऊन आत्महत्या केली कारण त्यांचा दीव दमणमधील तपास यंत्रणांवर विश्वास नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास का केला नाही, असा सवालही केतकर यांनी उपस्थित केला आहे.