पुणे: आज कॉंम्रेड गोविंद पानसरे यांचा सहावा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष शमशूद्दीन तांबोळी यांच्या हस्ते पुण्यात कॉम्रेड पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात पार पडले.
यावेळी विद्याधर ठाकूर, मिहिर थत्ते, विलास किरोते,नवीन इंदलकर सर, दिलावर शेख, श्रीकांत लक्ष्मी शंकर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉंम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी, २०१५ ला दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी गोळ्या झाडल्या, यामध्ये कॉ. पानसरे यांचा मृत्यू झाला होता. गोविंद पानसरे यांच्या मृत्यूला 6 वर्ष पूर्ण झाली. अद्यापर्यंत मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही. देशात अलिकडे विवेक विचाऱ्यांच्या व्यक्तींची अशा प्रकारे हत्या करण्यात येत असल्याचं विवेकी विचारवंतांचं म्हणणं आहे.