मुंबई-गोवा महामार्गाचं काम गणपतीपर्यंत पूर्ण करण्याच लक्ष - मंत्री रविंद्र चव्हाण
अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई- गोवा महामार्गांचे काम जोरदार सुरु आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी या महामार्गांची पाहणी केली. पनवेल पासून कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली असून, यावेळी त्यांनी बोलताना पहिल्या टप्प्याचे काम गणपतीपर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचं मंत्री चव्हाण यांनी सांगीतले.
गणपतीला मोठ्या संख्येने चाकरमाणी हे कोकणात जात असतात. या दरम्यान रस्ता खराब असल्याने अनेक गाड्यांचे अपघात होत असतात. 13 वर्ष या रस्त्याचे काम रखडलं आहे. सध्यातरी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला कामाला गती मिळाली आहे. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामाची पाहणी केली. दरम्यान यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की "गणपतीपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचा पहिला टप्पा 42 किलोमीटर अंतराचा आहे. यांच्या एका सिंगल लाईनचे काम हे गणपती पर्यंत पूर्ण व्हावे जेणेकरून प्रवाशांना त्याचा फायदा होईल. अनेक अडचणी आहेत, पाऊस आहे. मात्र त्यावर मात करत हा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा आमचा मानस असून त्याची आज पाहणी करत आहे. लवकरच काम व्हावे म्हणून काही उपाययोजना असतील तर त्या सुचवल्या जातील. मात्र, गणपती आधी सिंगल लाईन सुरू होणार" असल्याचा विश्वास मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.