मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर पाहणी दौऱ्यावर

Update: 2021-07-30 08:50 GMT

पश्चिम महाराष्ट्राला पुराचा तडाखा बसल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली आहे. पूराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला त्यांनी भेट दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांन मोठा फटका बसला. त्यातच सांगली आणि कोल्हापूर शहरं पाण्याखाली गेली होती. डोंगराळ भागात दरड कोसळण्याचे तसेच भुसखलन होण्याचेही प्रकार घडले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात पूरग्रस्त निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्तांशी संवाद साधला. तसेच शिवाजी पूल आणि पंचगंगा हॉस्पिटल येथे पूरग्रस्तांची त्यांनी विचारपूस केली. सकाळी पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर ते प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत. राज्य सरकारने अजून पूरग्रस्तांसाठी मदत पॅकेजची घोषणा केलेली नाही. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर केली जाईल असा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान पूरग्रस्त दुकानदार व नागरिकांना विमा दाव्याची ५०% रक्कम तातडीने द्यावी. त्यांचे दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरण्याचे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे केली आहे.

Tags:    

Similar News