मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडला रवाना, पण कशासाठी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील दावोसाठी रवाना झाले आहेत. पण एकनाथ शिंदे हे दावोस येथे कशासाठी जात आहेत? याविषयी त्यांनी माहिती दिली आहे.;
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वित्झर्लंडमधील दावोससाठी रवाना झाले आहेत. यावेळी विमानतळावरून रवाना होताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण दावोस येथे कशासाठी जात आहोत? ते स्पष्ट केले.
स्वित्झर्लंड देशातील डाव्होस (switzerland) येथे वर्ल्ड ईकोनिमिक फोरमने (World Economic Forum) आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी आज प्रयाण करतोय. या परिषदेत महाराष्ट्राची (Maharashtra) भूमिका मांडताना २० उद्योगांसोबत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक व्हावी, यासाठी संपूर्णपणे प्रयत्नशील राहीन, असं ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Visit to Davos) यांनी केले आहे.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे 20 जानेवारीपर्यंत चालणार परिषद
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 16 आणि 17 जानेवारी रोजी या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत अनेक बड्या उद्योगांसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्याबरोबरच पुढील महिन्यात होणाऱ्या'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-2018' (Magnetic Maharashtra Convergence 2018 ) या उद्योग परिषदेच्या आयोजनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा महत्वाचा मानला जात आहे.
दावोस (Davos) येथे होणाऱ्या परिषदेत जगभरातील शंभरहून अधिक देशातील अडीच हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यामुळे या परिषदेत महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याबरोबरच 16 जानेवारी रोजी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर काही महत्वाच्या उद्योगांसोबत सामंजस्य करार करणार आहेत. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणार आहेत.