महिला दिनानिमित्त इगतपुरीतील आदिवासी वाड्यापाड्यांना चित्रा वाघ यांची भेट...
आज जागतिक महिला दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने भाजपच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील आदिवासी पाड्यांना भेट देवून तेथील महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या.
जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day) पार्श्वभूमीवर भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी आज इगतपुरी तालुक्यातील धारणोली, डहाळेवाडी, खांबाळेवाडी, ठाकूरवाडी, कथरुवांगण, लंगड्याचीवाडी आणि इगतपुरी (Igatpuri) येथील घाटनदेवी मंदिर परिसरातील आदिवासी वाड्यापाड्यांना भेट दिली. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana), आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Yojana), संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana), जलजीवन मिशन (Jaljeevan Mission), घरकुल योजना (Gharkul Yojana), शौचालय योजना (Toilet Yojana), सहित विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहे की नाही? याबद्दल विचारपूस केली आणि महिलाशी संवाद साधला.
या वाड्या-पाड्यातील महिलांनी आपल्या अनेक समस्या यावेळी चित्रा वाघ यांच्यासमोर मांडल्या. लवकरच मी पुन्हा एकदा आपणा सर्वांची भेट घेऊन आपल्या सर्व समस्या शासन दरबारी मांडून, त्याचे लवकरच निराकरण करणार असल्याचे आश्वासन यावेळी चित्रा वाघ यांनी या पाड्यातील आदिवासी महिलांना दिले.