अपहार प्रकरणी वर्षभराच्या संघर्षानंतर सरपंचावर गुन्हा दाखल

चिमठाणा ग्रामपंचायतीत अपहार प्रकरणी सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान सरपंचावर अपात्रतेची कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.;

Update: 2021-08-16 12:30 GMT

धुळे  : धुळे जिल्ह्यातील महत्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या चिमठाणा ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार वर्षभरापूर्वीच झाली होती. ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आता उघड झाले आहे. गट विकास अधिकारी यांच्याकडे यांच्याकडे सर्वप्रथम तक्रार दाखल झाली होती, त्यानंतर धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंतर थेट विभागीय आयुक्त कार्यालयात चिमठाणे ग्रामपंचायतीच्या अपहार आणि अनियमितता यासाठी लढा सुरू होता. चौकशी दरम्यान तत्कालीन तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली होती, मात्र सरपंचांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती तक्रारदार शिवसेना नेते भरत राजपूत यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. आणि ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण करण्यात यावे मागणीसाठी लढा सुरू ठेवला.

लेखापरीक्षण झाल्याने अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत चिमठाणा येथे अनियमितता झाल्याचे उघड झाले. ग्रामसेवकांवर कारवाई झाली, मात्र सरपंचवर कोणतीही कारवाई होत नव्हती, आज अखेर विभागीय आयुक्तांनी चिमठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचवर शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास पाच लाखाचा अपहार आणि अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले असले , तरी येणाऱ्या काळात लेखपरिक्षणात कोट्यवधी रुपयांचा अपहार सिद्ध होईलच असा विश्वास गावकऱ्यांनी आणि भरत राजपूत यांनी व्यक्त केला आहे. तसेच आज गुन्हा दाखल झालेल्या सरपंचावर अपात्रतेची कारवाई व्हावी या मागणीने जोर धरला आहे.

एक वर्षाने का होईना सरपंचावर गुन्हा दाखल झाल्याने राजपूत यांनी समाधान व्यक्त केलं आहे. अजूनही आर्धी लढाई बाकी असून सरपंचावर अपात्रतेची कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असं राजपूत यांनी यावेळी सांगितले.

Tags:    

Similar News