साहित्य क्षेत्रात संवेदनशील विहार करणारे व्यक्तीमत्व हरपले – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
ज्येष्ठ लेखक, समिक्षक, नाटककार, पत्रकार जयंत पवार यांचं रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य, सिने तसेच नाट्यसृष्टीत शोककळा पसरली आहे. जयंत पवार यांच्या निधनावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ट्विटरवर "साहित्य क्षेत्रात संवेदनशील विहार करणारे व्यक्तीमत्व हरपले", असे ट्विट करत प्रतिक्रीया दिली.
उध्दव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मराठी नाट्य क्षेत्रातील साक्षेपी आणि पत्रकारिता, साहित्य अशा क्षेत्रात निखळ तितकाच संवेदनशील विहार करणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची, खंत त्यांनी व्यक्त केली. मुंबईतील नजरेआड गेलेल्या गिरण्या, कष्टकरी त्यांची गिरणगाव संस्कृती पवार यांच्यामुळे शब्द रूपाने जिवंत आहे. परखड, निखळ नाटककार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. या क्षेत्राला त्यांची निश्चितच उणीव भासत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जयंत पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मराठी नाट्य क्षेत्रातील साक्षेपी आणि पत्रकारिता, साहित्य अशा क्षेत्रात निखळ तितकाच संवेदनशील विहार करणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची, खंत त्यांनी व्यक्त केली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 29, 2021