जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक बदलुन देण्याची विद्यार्थ्यांची मागणी...

शिक्षकांच्या आडमुठी धोरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसबी-खेड गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होत आहेत. नेमके या शाळेत चाललंय तरी काय? वाचा आमचा विशेष रिपोर्ट...;

Update: 2023-02-02 15:08 GMT

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसबी-खेड या गावातील विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. शाळेची वेळ ही सकाळची असून देखील शिक्षक आपल्या सोयीनुसार दुपारी शाळेवर येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबाच शिक्षकांनी मांडल्याचे येथे पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे शाळेतील वर्ग सुरु असताना शिक्षक हे वर्गामध्ये मोबाईल घेऊन बसत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी अनेक वेळा वरिष्ठांकडे केली आहे. मात्र त्यावर कोणताही निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

शाळेत भरदुपारी येणारे शिक्षक आणि अभ्यासक्रम सोडून इतर काम करणारे गुरुजी यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. काळ्या रंगाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक उत्साही नसल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोकळेपणाने आपली मते यावेळी मांडली. आणि अशा कामचुकार व वेळेवर शाळेमध्ये न येणाऱ्या जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक बदलून देण्याची मागणी आता विद्यार्थ्यांनी केली आहे.

Tags:    

Similar News