मूठभर शेतकऱ्यांच्यावर कायदे ठरत नसतात: चंद्रकांत पाटील

मूठभर शेतकऱ्यांच्यावर कायदे ठरत नसतात: चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ व्हाय़रल...;

Update: 2021-01-08 05:49 GMT

दिल्ली मध्ये लाखो शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात थंडीत, पावसात आंदोलन करत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून हा शेतकरी आपल्या मुला बाळांना सोडून रस्त्यावर आंदोलन करत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी

'मूठभर शेतकऱ्यांच्यावर कायदे ठरत नसतात' असं म्हणत शेतकरी कायद्याला विरोध केला आहे. ते नितेश राणे यांनी आयोजीत केलेल्या एका सभेत बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक नेटीझन्स यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वाक्याचा खरपूस समाचार घेतला आहे.


Full View
Tags:    

Similar News