केंद्र सरकारची खासदार नवणीत राणा यांना VIP सुरक्षा

राणा दांम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. तर मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून खासदार नवणीत राणा आणि रवी राणा यांना नोटीस पाठवली आहे. मात्र त्यापाठोपाठ केंद्र सरकारने खासदार नवणीत राणा यांना VIP सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.;

Update: 2022-04-23 03:03 GMT

राणा दांम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. तर मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून खासदार नवणीत राणा आणि रवी राणा यांना नोटीस पाठवली आहे. मात्र त्यापाठोपाठ केंद्र सरकारने खासदार नवणीत राणा यांना VIP सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी समर्थक खासदार म्हणून ओळख असलेल्या अपक्ष खासदार नवणीत राणा गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्यातच खासदार नवणीत राणा यांनी मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान केंद्र सरकारने खासदार नवणीत राणा VIP सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन राणा दांम्पत्याने हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली आहे. तर राणा दांपत्य त्यांच्या खार येथील निवासस्थानी आहेत. त्यामुळे त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश खेरवाडी पोलिसांनी दिले आहेत. तसेच राणा दांम्पत्याने सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे कृत्य केल्यास नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून दाखवण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान खासदार नवणीत राणा आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना केंद्रीय जवानांची विशेष सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजप समर्थकांनाच केंद्रीय सुरक्षा आंदण

अभिनेत्री कंगणा राणावतने सुशांत सिंह राजपुत प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तर त्यानंतर मुंबई महापालिकेने कंगणाच्या घरावर बुलडोजर चालवला होता. त्यावेळी कंगणाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने कंगणाला वाय दर्जाची सुरक्षा दिली होती.

त्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनाही केंद्रीय सुरक्षा देण्यात आली. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.

मोदी समर्थक खासदार नवणीत राणा यांच्या इशाऱ्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असतानाच केंद्र सरकारने नवणीत राणा यांना विशेष सुरक्षा दिली आहे.

Tags:    

Similar News