शिवसेनेच्या माजी महापौरांच्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रेशन

उद्धव ठाकरेंच्या आदेशाला शिवसेना नेत्यांकडून केराची टोपली

Update: 2021-05-06 15:45 GMT

राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गर्दी करून नका आणि कोरोनाचे नियम पाळा असे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशाला शिवसेना नेत्यांकडून केराची टोपली दाखवत आहे.

औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडले यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत करण्यात आलं.कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनसाठी ढोल ताशे आणि फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा केली.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी कोरोनाचे नियम तोडत एका कार्यक्रमाचे उद्घाटन केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

त्यापूर्वी शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत असेच कोरोनाचे नियमांना पायी तुडवत निवडणूक जिंकल्याचा आनंद साजरा केला होता.त्यामुळे लोकांना नियम सांगणाऱ्या मुख्यमंत्री यांनी आधी आपल्या नेत्यांना समज देण्याची गरज आहे.

Full View

Tags:    

Similar News