सिंदखेड राजामध्ये जिजाऊ जयंती साधेपणाने साजरी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर माँसाहेब जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे 424 वा जिजाऊ जन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. तर पालकमंत्र्यांच्या हस्ते जिजाऊंच्या राजवाड्यातील पुतळ्याचे शासकीय पुजनही करण्यात आले.;

Update: 2022-01-12 07:45 GMT

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने निर्बंध जारी केले आहेत. त्यातच 12 जानेवारी राजी सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पुजन करून 424 व्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. तर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिजाऊंचे वंशज आणि माँसाहेब जिजाऊंच्या पुतळ्याचे पुजन केले. यावेळी उपस्थितांनी जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तर मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसार यंदा 50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जात आहे. सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांची गर्दी पहायला मिळणार नाही. मात्र जिजाऊ जन्मोत्सव असल्याने राजवाडा आणि जिजाऊ सृष्टी येथे विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंसारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही. तर खऱ्या अर्थाने संस्कार देणारी राजमाता म्हणून जिजाऊंचा उल्लेख केला जातो, असे मत डॉ. शिंगणे यांनी व्यक्त केले. तर कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभुमीवर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमीत्त घरीच राहून जिजाऊंना वंदन करावे, असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. 

Tags:    

Similar News