एम आय एम नेत्यावर पत्नीचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Update: 2021-10-25 06:37 GMT

जीवे मारण्याची धमकी देणे अनैसर्गिक संभोगाची सक्ती करणे. तसेच अन्य महिलांची अनैतिक संबंध ठेवणे. फसवून दुसरे लग्न करणे. अशा अनेक बाबतीत सभा चौधरी यांनी आपले पती आणि एम आय एम चे नेते शंमशूलला चौधरी यांच्यावर साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दबावाखाली असलेल्या पोलिसांनी अखेरीस गुन्हा दाखल केला आहे.

अंधेरी साकीनाका येथील एम आय एम चे नेते शमसुलला चौधरी यांच्याविरोधात एडवोकेट नवीन चोमल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात शामशुल्ला कडून घटस्फोटित पत्नीवर अन्याय झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही शमशुला याच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

पत्नी सबा हिने दाखल केली तक्रार

अखेरीस त्याची पहिली पत्नी सबा हिने साकीनाका पोलीस ठाण्यात समस उल्ला यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शमसूल्ला यांनी सबा हिच्याशी लग्न केल्यानंतर तिच्यावर अनन्वित छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. यात तिला जीवे मारण्याची धमकी देणे, अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी देणे, अनैसर्गिक संभोग करण्याची सक्ती करणे, तसेच माहेरहून वारंवार हुंड्यासाठी तगादा लावणे असे अनेक आरोप केले आहेत.

शमसुल्ला यांनी अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोपही सबा हिने केला आहे. यासंदर्भात दीर रमजान आणि सासरे जैनुद्दीन यांना सांगितले असता, त्यांनी दुर्लक्ष केले, उलट रमजान याने लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिने केला आहे.

हुंड्यासाठी वारंवार छळ केल्याचा आरोप

शमसुल्ला याने आपल्याकडून सुमारे 15 लाख रुपये विविध कारणांसाठी उकळले आहेत, तसेच लग्नात देण्यात आलेले 45 तोळे सोने ही या कुटुंबातील व्यक्तींनी चोरल्याचा आरोप सबा हिने केला आहे. सबा हिला चार वर्षांची मुलगी साधिया असून सध्या ती आपल्या माहेरी राहत आहे.

जैगून भेटल्याचा सबाचा दावा

काही दिवसापूर्वी जैगून नावाची महिला आपल्याला भेटली होती. तिनेही समसुल ला अत्याचार करीत असल्याचे सांगितले होते. यावेळेस शमसूला याने तिला आपल्या घरी येऊन मारहाण केल्याचेही सबाने तक्रारीत म्हटले आहे.

साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

या संदर्भात साकीनाका पोलिस ठाण्यामध्ये शमसूला याच्याविरोधात भादवि कलम ३२३ ३७७,४०६, ५०६ ,३४,आणि ५०४ अन्वये गुन्हा नोंद झाला असून अद्याप या प्रकरणी चौकशी सुरू असून कोणालाही अटक झाली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले.

Tags:    

Similar News