cable bridge collapse in Gujrat : डागडूजी केलेला झुलता पूल को-स-ळ-ला, 68 जणांचा मृ-त्यू

पाच दिवसांपुर्वी डागडूजी केलेला गुजरातमधील मोरबी येथील झुलता पूल पाण्यात कोसळला. या दुर्घटनेत तब्बल 68 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.;

Update: 2022-10-31 01:40 GMT

cable bridge collapse in Gujrat machchu river : गुजरातमध्ये निवडणूकीची (Gujrat election)धामधूम सुरू आहे. दरम्यान पाच दिवसांपुर्वी मोरबी येथील मच्छू नदीवरील (Machchu river morbi) झुलत्या पुलाची दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या पाच दिवसातच मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळला. यामध्ये तब्बल 68 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (cable bridge collapse 68 death)

मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत 68 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही दुर्घटना घडताच बचाव दल घटनास्थळी (SDRF)दाखल झाले. त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली असून यामध्ये 70 पेक्षा अधिक लोकांना पाण्यातून बाहेर काढले आहे. जखमींना प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र काहींची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी (gujrat home minister harsh sanghavi) यांनी दिली.

एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी सायं. 7 वा. मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळला. मात्र त्यावेळी 60 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र पहाटे वा. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या 68 वर पोहचली आहे. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Gujrat CM Bhupendra patel) यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून ते घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री पटेल यांनी रुग्णालयाला भेट देत मृतांना आणि जखमींना तातडीने मदतीची घोषणा केली.

गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi tweet) यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत गुजरात सरकारने जाहीर केली आहे.

पंतप्रधान मोदी यांचे गुजराती भाषेत ट्वीट

भुपेंद्र पटेल यांनी केले ट्वीट

टीप- बातमी अपडेट करत आहोत

Tags:    

Similar News