आर्यनच्या अटकेचा शाहरूखला फटका, BYJU'S ने जाहिराती केल्या बंद ?

Update: 2021-10-09 12:39 GMT

मुंबईत क्रुझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. आर्यनची रवानगी सध्या आर्थर रोड तुरूंगात करण्यात आली आहे. मार आर्यनच्या अटकेचा फटका आता शाहरूख खानला बसण्यास सुरूवात झाली आहे. आर्यनच्या अटकेनंतर BYJU'S या प्रसिध्द शैक्षणिक कंपनीने शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असं वृत्त इकॉनॉनिक टाईम्सने दिलं आहे.

BYJU'S या एडटेक स्टार्टअप कंपनीने गेल्या काही दिवसांपासून ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगाऊ बुकिंग असूनही शाहरूखच्या जाहिरातींचं प्रसारण बंद केलं आहे. शाहरुख Hyundai, LG, Dubai Tourism, Reliance Jio सारख्या अनेक आघाडीच्या ब्रँडचा चेहरा आहे. BYJU'S हे शाहरूखसाठी सर्वात जास्त पैसे मोजणारं ब्रँड होतं. इकॉनॉनिक टाईम्सने BYJU'S च्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असं म्हटलं आहे.

शाहरूख खान २०१७ पासुन BYJU'S कंपनीचा ब्रँड अम्बॅसेडर राहिला आहे. BYJU'S कंपनी वर्षाला शाहरूखसाठी ३ ते ४ कोटी रूपये मोजत होती.

काय आहे मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरण?

३ ऑक्टोबर रोजी मुंबईत NCB ने एका क्रुझ वर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर टाकलेल्या धाडीत शाहरूखचा मुलगा आर्यन खान सह ८ जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला ७ऑक्टोबर पर्यंत NCB कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याची कसुन चौकशी करण्यात आली होती. परंतू आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळले नव्हते. मात्र त्याच्यावर NDPC 36A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन खानचा जामीन अर्ज शुक्रवारी मुंबईतील किल्ला कोर्टाने फेटाळला असुन त्याची रवानगी आर्थर रोड तुरूंगात केली आहे.

Tags:    

Similar News