अर्थसंकल्प शेतकरी, कामगार यांच्या हिताचा - महादेव जानकर
अर्थसंकल्पात सरंक्षण, आरोग्य, शिक्षण व शेतकरी या चार गोष्टींवर जास्त तरतूद करण्यात आल्या असून हा अर्थसंकल्प शेतकरी, कामगार यांच्या हिताचा असल्याचे मत आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी देशाचे २०२१-२२ या वर्षासाठीचे बजेट सादर केले. हा अर्थसंकल्प शेतकरी, कामगार यांच्या हिताचा असून अर्थसंकल्पात सरंक्षण, आरोग्य, शिक्षण व शेतकरी या चार गोष्टींवर जास्त तरतूद करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री हेल्थ केअर युनिट व दोन मोबाइल हॉस्पिटल चालू करण्याचा जो निर्णय घेतला आहे, ही खूप आनंदाची बाब असल्याचे मत आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.
अर्थसंकल्पात सरंक्षण, आरोग्य, शिक्षण व शेतकरी या चार गोष्टींवर जास्त तरतूद करण्याचा प्रयत्न केला असून उपेक्षित लोकांसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल जानकर यांनी केंदीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले.