Breaking News: जळगाव SBI दरोडा पोलीस अधिकारीच निघाला चोर

Update: 2023-06-04 02:15 GMT

दरोड्यातील मुख्य आरोपी असलेला पोलीस उपनिरीक्षकाचे काही दिवसांपूर्वी निलंबन झाले असून तो रायगड येथे कार्यरत होता. शंकर जासक असं अटकेतील पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

शंकरसह रमेश जासक व बँकेचा शिपाई मनोज सूर्यवंशी यांच्या चोवीस तासातच पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपींकडून सोने रोकड सह सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

17 लाख रोकड व 3 कोटी 60 लाखांचे सोने हस्तगत पोलिसांनी जप्त केले आहे.

अटकेतील दोन्ही आरोपी एकमेकांचे नातलग आहेत.

जळगाव शहरातील स्टेट बँकेत गुरुवारी दिवसाढवळ्या दरोडा घालण्यात आला होता. बँकेचा शिपाईचं या दरोड्याचा मुख्य सूत्रधार निघाला असून त्याने आपल्या पोलीस उपनिरीक्षक असलेल्या पाहुण्याशी संगनमत करून बँकेत दरोडा घातल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी जळगाव पोलिसांनी 24 तासांत आरोपी बँकेचा शिपाई मनोज सूर्यवंशी, लाच प्रकरणात निलंबित रायगड येथील पीएसआय शंकर जासक आणि त्याचा पिता रमेश जासक याला अटक केली आहे. पीएसआय जासक याने वडिलांना जळगाव जिल्ह्यातील मन्यारखेडा गावाला सोडून रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे लुटून नेलेला मुद्देमालासोबत पलायन केलं होतं. यात 17 लाखांची रोकड व 3 कोटी 60 लाख रुपयांचे बँकेत तारण ठेवलेले सोने होते. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरोड्यात लांबविलेल्या रक्कमेतून केवळ 70 हजार रुपये आरोपींनी खर्च केले होते. आरोपींना आज जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


Full View

Tags:    

Similar News