अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.;
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अनुपम खेर या अभिनेत्याने सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल ट्विट केले. ट्वीट मध्ये त्यांनी सतीश कौशिक यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “मी तुम्हाला सांगतो, महामारीच्या काळात सतीश कौशिक यांना कोविडची लागण झाली होती. त्यामुळे ते नेहमी अस्वस्थ असायचे. दरम्यान "मृत्यू हे या दुनियेच शेवटचे सत्य आहे, याची मला जाणीव आहे, तरीही, मी माझा जिवलग मित्र सतीश कौशिक याच्या साठी असं काही तरी लिहिल याचा विचार मी कधी स्वप्नात पण केला नव्हता. ४५ वर्षांच्या मैत्रीवर पूर्णविराम लागला आहे.
“जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔”
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
13 एप्रिल 1956 रोजी सतीश कौशिक Satish Kaushik यांचा जन्म हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या "मासूम" या चित्रपटासोबत त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत सुमारे 100 चित्रपटांमध्ये योगदान दिले आहे. 1990 मध्ये "राम लखन" आणि 1997 मध्ये "साजन चले ससुराल" या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. "सेल्समन रामलाल" या हिंदी नाटकाने त्यांना त्यांच्या सर्वात सुप्रसिद्ध थिएटर भूमिकांपैकी एक दाखवले. 1993 रोजी फिल्ममेकर म्हणून त्यांचा पहिला चित्रपट रूप की रानी चोरों का राजा हा होता, ज्यामध्ये श्रीदेवी मुख्य भूमिकेत होती. सतीश कौशिक यांचा तेरे संग हा त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला चित्रपट होता.
1999 मध्ये आलेला हम आपके दिल में रहते हैं हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला. 2005 ला वादा हा चित्रपट सतीश कौशिक दिग्दर्शित आणि अर्जुन रामपाल, अमिषा पटेल आणि झायेद खान यांच्यासह चित्रपट प्रदर्शित झाला. 2007 मध्ये कौशिक आणि अनुपम खेर यांनी करोल बाग प्रॉडक्शन चित्रपट कंपनीची स्थापन केली.