सत्तेसाठी काँग्रेसकडून हिंदू- मुस्लिम वाद सुरू केला जातो-आमदार डॉ संजय कुटे
NCB ने शाहरुख खानच्या मुलावर केलेली कारवाई प्रकरणाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हिंदू-मुस्लीमांशी जोडल्याने त्यांच्यावर भाजपकडून टीका होत आहे. नाना पटोले यांचे वक्तव्य हे अतिशय दुर्दैवी असून हे त्यांची प्रवृती दाखवून देणारे वक्तव्य आहे, मुस्लिमांना भाजपच्या विरोधात करण्याचा हा प्रयत्न असून, आपण पुन्हा सत्तेत येणार नाही या भीतीपोटी पटोले यांनी असे वक्तव्य करून हिंदू मुस्लिम वाद सुरू करण्याचा हा प्रयत्न केला आहे, त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राला न शोभणारे आहे असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे यांनी दिली आहे.
ते बुलडाणा येथे सुरु असलेल्या भाजपाच्या निवासी प्रशिक्षण वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमाला आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
दरम्यान काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी मुस्लिम बांधव यांच्या वक्तव्याला बुलणार नाहीत त्यांची प्रवृत्ती सर्वांनी ओळखली आहे आहे असं आमदार कुटे म्हणाले