राज्यात रोज कुठे ना कुठे महिला आणि मुलींवर अत्याचाराच सत्र सुरू आहे, पण सरकार त्यावर ठोस कारवाई करत नसल्याचा टीका भाजप(bjp) नेत्या चित्रा वाघ(Chitra wagh) यांनी केली आहे. "8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी समोर येतेय, डोंबिवलीची (dombivali) घटना कालचीच आहे, पोलिसांची भीती उरली नाहीये, 33 आरोपी असल्याचं स्पष्ट झालं आहे, संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे" असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. घटना घडल्यानंतर सरकार त्या गुन्ह्याबद्दल काय भूमिका घेतं, हे महत्त्वाचं असतं, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये बलातकाऱ्यांना राजाश्रय देण्याचं काम सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
सगळे पुरावे असूनही कारवाई होत नाही. संजय राठोडवर अद्याप मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही. कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही मात्र बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी एकत्र येतात. मेहबूब शेखवरही काहीही कारवाई होत नाही, पोलीस कानाडोळा करतात म्हणून घटना थांबत नाहीत. सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून त्याला रॉयल ट्रीटमेंट देतात का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
"औरंगाबाद पोलिसांनी कोर्टात सादर केलेला बी समरी रिपोर्ट कोर्टाने फेटाळला आहे. पोलीस पीडितेसाठी काम करत नव्हते तर आरोपी मेहबूब शेखसाठी काम करत होते. पोलिसांनी पीडितेच्या घरी भेट देऊन तिची बदनामी करण्याचं काम केलं. आरोपी हा राजकीय माणूस असल्याने असे जाणूनबुजुन करण्यात आलं, सरकार लोकधार्जिणे नाही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे" अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केलसी आहे.
पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे मेहबूब शेख याला अटक करावी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. कुठल्या कुठल्या नेत्याने त्यांनी फोन केले यासाठी त्यांचा सीडीआर काढावा, अशी मागणी त्यांनी केली. "डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 लाख लोक राहतात पण पोलीस ठाण्याचे मनुष्यबळ हे फक्त 140 इतकं आहे, ते कस संरक्षण करणार. महापौर बोरीवलीला गेल्या त्याचे स्वागत पण तशाच डोंबिवलीला का नाही गेल्या, त्या प्रकरणाची दखल घ्यावीशी वाटली नाही का असा सवालही त्यांनी विचारला आहे.