महाराष्ट्र बंद ; भाजपला चिंता उत्तरप्रदेशच्या बदनामीची

महाराष्ट्र बंद ; भाजपला चिंता उत्तरप्रदेशच्या बदनामीची;

Update: 2021-10-11 13:43 GMT

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरामधे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद केला. भारतीय जनता पार्टीनं या बंदचा विरोध केला. एवढेच नव्हे तर मुंबईतील उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष डॉ. संजय पांड्ये यांनी ट्विट करुन `महाराष्ट्र बंद म्हणजे उत्तर प्रदेशाच्या बदनामीचं कट कारस्थान` असल्याचं म्हटलं आहे.



 


``महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंद केला. मला वाटलं महाराष्ट्रात होणाऱ्या साधुसंतांवर आणि महीलां होणाऱ्या अत्याचाराविरोधी अत्याचारासाठी हा बंद असेल. महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीनं बेजार आहे. उध्दव ठाकरे सरकारनं मदतीसाठी एक रुपया शेतकऱ्यांना दिला नाही. हा बंद महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी असेल असं वाटलं होतं. दुर्देवानं हा बंद खीर- लखीमपूरमधे झालेल्या घटनेसाठी होता, असं पांड्ये म्हणाले.




योगी आदित्यनाथ सरकार न्याय देत असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने ठाकरे सरकार राजकारण करत आहे. वाद निर्माण करुन उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील जनतेला बदनाम करण्याचं कटकारस्थान संजय राऊत यांनी रचलं आहे. ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,असा इशारा संजय पांडे यांनी दिला आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या टिकेल सडेतोड उत्तर दिले आहे. मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सावंत म्हणाले, महाराष्ट्र बंद हा उत्तरप्रदेश जनता आणि तेथील शेतकऱ्यांची भावना आहे. लखीमपूर-खीरच्या शेतकऱ्यांना चिरडण्याच्या दुर्देवी घटनेचा देशपातळीवर आणि आंतराष्ट्रीय पातळीवर प्रतिबंब पडले आहे. दोषींना पाठिशी घालणाऱ्या उत्तरप्रदेश राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्र्यांचा हा विरोध आहे. एक प्रकारे महाराष्ट्रातील जनतेनं उत्तर प्रदेशाच्या जनता आणि शेतऱ्यांच्या भावनेला साद दिली आहे. भाजपचे नेते उत्तर भारतीयांना पुढे आणुन हा उत्तर प्रदेश आणि उत्तरप्रदेशातील जनतेचा अपमान आहे असं म्हणत असतील तर ते हास्यास्पद आहे, असं सावंत यांनी सांगितलं.

Tags:    

Similar News