Biparjoy cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ वेगाने पाकिस्तानच्या (Pakistan) दिशेला झेपावत असल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे. पाकिस्तानच्या हवामान विभागाने (Department of Meteorology)यासंबंधी सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या सूचनेनुसार १८० प्रति किमी वेगाने हे वादळ येऊ शकते. वादळामुळे समुद्रात ३० फुटांच्या लाटा उसळू शकतात. आज सायंकाळी हे वादळ केटी बंदर आणि गुजरात (Gujarat)तटाच्या दरम्यान आदळू शकते. यामुळे सिंध (Sindh) प्रांतातील थट्टा, सुजावल , बादीन, उमरकोट,थारपारकर, मेरपुरखास या जिल्ह्यामध्ये तीव्र वादळी पावसाची शक्यता आहे. यामुळे या परिसरात मोठे नुकसान होऊ शकते. कराची हैदराबाद (Hyderabad) टंडो सहित अनेक शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. पाकिस्तानने खबरदारी म्हणून समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचा इशारा दिला आहे. या आपत्तीपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी एनडीआरएफ बरोबरच इतर आपत्ती व्यवस्थापन दले सज्ज झाली आहेत.
पाकिस्तान सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत तीन जिल्ह्यातील ५६,९८५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सरकारी शाळा महाविद्यालयात राहण्यासाठी तात्पुरते कँप उभारण्यात येत आहेत. पाकिस्तानी नौसेनेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार विविध गावातील ७०० नागरिकांना तसेच ६४ मच्छमारांना सुरक्षित स्थळी नेण्यात जवानांना यश मिळाले आहे.