ईडीच्या कारवाईला विरोध करणारी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मलिक यांनी ईडीच्या कारवाईला विरोध करणारी याचिका केली होती.
मलिक यांनी ईडीच्या कारवाईला विरोध करणारी याचिका केली होती. ईडीकडून आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचा दावा मलिक यांनी या याचिकेतून केला होता. त्यावर कोर्टाने मलिक यांना फटकारले आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा मलिकांचा दावा होता.
3 फेब्रुवारीला एनआयएने दाऊत विरोधात गुन्हा दाखल केलाय. मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी तसंच अन्य गुन्ह्यात दाऊदचा सहभाग आहे, असं ईडीचे एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात याची माहिती दिली आहे. इतकंच नाही तर मलिक आणि दाऊद यांच्यात कसे संबंध आहेत, हे देखील त्यांनी न्यायालयात सांगितलं. त्यानुसार दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर दाऊदचा कारभार पाहत होती. तिच्याकडून मलिक यांनी दाऊदची बेनामी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप मलिकांवर आहे.
दाऊदची 200 कोटी रुपयांची संपत्ती कमी किंमतीत विकत घेतली. हा व्यवहार रोखीने झाला. त्यात 55 लाखाचा व्यवहार झाला. मलिक यांच्या कुटुंबाच्या एका कंपनीकडे या संपत्तीची मालकी आहे. या कंपनीवर मलिक यांचा मुलगा संचालक आहे. काही काळ ही कंपनी मलिक यांच्या नियंत्रणाखाली होती, असा आरोप सिंग यांनी कोर्टात केलाय. इतकंच नाही तर कुर्ल्यातील मालमत्ता मरियम आणि मुनिरा या दोघींच्या नावावर करण्यात आली होती. ही जमीन मुळात दाऊद गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. ही जमीन सलीम पटेलची होती आणि तो अंडरवर्ल्डशी संबंधित होता. ती संपत्ती आता मलिक यांच्या कंपनीकडे आहे, असंही सिंग यांनी म्हटलंय.