रोख सको तो रोक लो हम तो कश्मीर जाते रहेंगे - काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा इशारा
बाळासाहेबांची शिवसेनेतील खा. राहुल शेवाळे यांनी भारत जोडो यात्रा थांबवावी असे विधान केले होते त्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक होताना पाहायाला मिळाले. राहुल गांधी यांनी देखील ही यात्रा सरकारने थांबवून दाखवावी असे राज्य सरकारला चँलेंज केले.
राहुल गांधी यांच्या सभेतून वारंवार केंद्रसरकारसह राज्यसरकारवर देखील टीका केली जाते. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांच्या वक्तव्यामुळे बाळासाहेबांची शिवसेनेतील खा. राहुल शेवाळे यांनी भारत जोडो यात्रा थांबवावी असे विधान केले होते त्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक होताना पाहायाला मिळाले. राहुल गांधी यांनी देखील ही यात्रा सरकारने थांबवून दाखवावी असे राज्य सरकारला चँलेंज केले. याच मुदद्यांवर काँग्रेसच प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील बुलढाण्यात माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
अतुल लोंढे म्हणाले की – "रोख सको तो रोक लो हम तो कीश्मीर जाते रहेंगें. जे मानसिक विभाजन धर्मांच्या नावान केले जात, आर्थिकदृष्ट्या बहुजन वर्गाला कमजोर करण्याच काम केल जात, हम दो हमारे दो च्या सरकारने अकरा कोटींची माफी आपल्या मित्र पक्षाला दिली. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही. महागाई आणि बेरोजगारी प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे. देशाचे संविधान अडचणीत आले आहे. संविधान बदलण्याचा वळवळ प्रयत्न आपल्याला दिसत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी भारत जोडोची आवश्यकता आह. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासोबत लोक रस्त्यावर उतरलेत त्यामुळे पंढरी घाबरलेली आहे." अश्या स्वरुपात टीका अतुल लोंढे यांनी भाजपवर केली आहे. अतुल लोंढे यांच्या वक्तव्यावर भाजप काय मत मांडले ते पाहणं महत्त्वाच ठरेल.