लोकनेते माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
लोकनेते माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था व यशोमतीताई ठाकूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना ट्रासयिकल व विविध सहाय्यभूत उपकरणांचे वाटप, तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात सव्वाशेहून अधिक नागरिकांनी सहभागी होऊन लोकनेते स्व. ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली.;
लोकनेते माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था व यशोमतीताई ठाकूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना ट्रासयिकल व विविध सहाय्यभूत उपकरणांचे वाटप, तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात सव्वाशेहून अधिक नागरिकांनी सहभागी होऊन लोकनेते स्व. ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली.
आदरांजलीपर कार्यक्रमाला आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जि. प. सभापती पूजाताई आमले, पं. स. सभापती शिल्पाताई हांडे, आरपीआयचे नेते राजेंद्र गवई, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर, संध्याताई सव्वालाखे, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे किशोर बोरकर, बबलू शेखावत, हरीभाऊ मोहोड, सुरेशराव साबळे, डॉ. रघुनाथ वाडेकर तसेच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
विविध मान्यवरांकडून आदरांजली
माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर हे कृतीशील नेते होते. वंचित, शोषितांच्या हितासाठी त्यांनी आयुष्य वेचले. ते व्यासंगी व अभ्यासू नेते होते. तालुक्याच्या दीर्घकालीन विकासाची दृष्टी ठेवून त्यांनी अनेक कामे केली. अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी केली. त्यांच्या कार्याचा सुगंध अविरत दरवळत राहील, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी माजी आमदार स्व. ठाकूर यांना आदरांजली वाहिली. स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा वारसा यशोमतीताई ठाकूर समर्थपणे सांभाळत आहेत, अशी भावनाही विविध मान्यवरांनी व्यक्त केली.
बाराशेहून अधिक दिव्यांगांना उपकरणे वाटप
यानिमित्त बाराशेहून अधिक दिव्यांग बांधवांना मोटराईज्ड ट्रायसिकल, साध्या ट्रायसिकल, इलेक्ट्रॉनिक श्रवणयंत्र, रोलेटर, व्हीलचेअर्स आदी विविध उपकरणांचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवकांचा त्यात लक्षणीय सहभाग होता. सव्वाशेहून अधिक नागरिकांनी रक्तदान करून स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी आदरांपलीपर भजनगीतांचा कार्यक्रमही झाला. त्याला मान्यवरांसह स्थानिक नागरिकही उपस्थित होते. निवेदक अनिरूद्ध पाटील यांनी सूत्रसंचालन केले.