छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बांधणारा बेलदार समाज मागे पडला- साळुंके

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यात सरकार चालवणाऱ्या राज्य शासनाचे बेलदार समाजाकडे दुर्लक्ष केल्याची भावना अमरावती येथील बेलदार समाजाचा मेळाव्यात व्यक्त करण्यात आली

Update: 2021-08-19 09:35 GMT

 संपूर्ण देशासह जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता म्हणून परिचित आहे, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच गड किल्ले ज्या बेलदार समाजाने बांधले तो बेलदार समाज मात्र महाराष्ट्रात मागे पडल्याची खंत महाराष्ट्र राज्याचे बेलदार भटकी जमात संघटनेचे अध्यक्ष राजीव साळुंके यांनी व्यक्त केली. ते अमरावती जिल्ह्यात बेलदार भटकी जमात संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यात सरकार चालवणाऱ्या राज्य शासनाचे देखील या समाजाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे साळुंके यांनी म्हंटले आहे. बेलदार समाजाला अजूनही जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, अजूनही त्यांच्यापर्यंत घरकुल योजना पोहोचली नाही त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे असे वक्तव्य त्यांनी अमरावती येथील बेलदार समाजाच्या मेळाव्यामध्ये केले.

बेलदार समाजाच्या मागण्यांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष घातले नाही तर समाजाच्या वतीने राज्यात तीव्र आंदोलन करण्याची वेळ या समाजावर येईल अशी भूमिका त्यांनी मेळाव्यात बोलताना व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य चालवणाऱ्या राज्य सरकारने महाराजांच्या मावळ्यांकडे असे दुर्लक्ष करणं योग्य नसल्याची भावना त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Tags:    

Similar News