Beauty Contest | महिला डॉक्टरांची सौंदर्य स्पर्धा
महिला डॉक्टर्ससाठी एका सौंदर्य स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील २०० पेक्षा अधिक महिला डॉक्टर्स सहभागी झाल्या होत्या. मेडिक्वीन मेडिको पिजंट तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर आणि डॉ. प्राजक्ता शहा यांनी २३ आणि २४ जानेवारी २०२३ रोजी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
विवाहित महिला डॉक्टर्ससाठी पुणे इथे एका सौंदर्य स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील २०० पेक्षा अधिक महिला डॉक्टर्स सहभागी झाल्या होत्या. मेडिक्वीन मेडिको पिजंट तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर आणि डॉ. प्राजक्ता शहा यांनी २३ आणि २४ जानेवारी २०२३ रोजी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
गेल्या चार वर्षांपासून या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षीच्या स्पर्धेसाठी सेमी फायनलचे परीक्षक म्हणून तेजपाल वाघ आणि सामाजिक कार्यकर्ते तथा अमेरिकेतील डॉ. जया दप्तरदार यांनी काम पाहिले. तर अंतिम फेरीसाठी डॉ. माधवी भावे व डॉ. शिल्पा हक्की आणि केदार गायकवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं.
महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टर्ससाठी या सौंदर्य स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. सौंदर्य स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून या स्पर्धेमध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, दंत चिकित्सा, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अशा सर्व वैद्यकीय भागातील डॉक्टर्सांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धेत डॉक्टरांचे सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्रातील कामे, कलागुण, फिटनेस, छंद, व्यक्तिगत यश अशा अनेक गोष्टींवर भर दिला जातो.
या अनोख्या सौंदर्य स्पर्धेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस, एशिया बुक ऑफ रेकॉर्डस यामध्ये झालेली आहे. याशिवाय ५ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या महिला डॉक्टर्सना 'मेडिक्विन एक्सलन्स अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले होते.
ही स्पर्धा दोन वेगवेगळ्या गटामध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील मुख्यगटामध्ये प्रथम विजेत्या ठरल्या त्या कल्याणच्या डॉ. सोनाली पितळे, तर पहिल्या उपविजेत्या ठरल्या साताऱ्याच्या डॉ. धनश्री नलावडे, तसेच दुसऱ्या उपविजेत्या ठरल्या ठाण्याच्या डॉ. स्नेहल कोहळे आणि पुण्याच्या डॉ. स्नेहा सावंत...त्याचप्रमाणे क्लासिक गटामध्ये मुंबईच्या डॉ. ज्ञानदा बांदोडकर प्रथम स्थान पटावून विजेत्या ठरल्या. तर पहिल्या उपविजेत्या ठरल्या मुंबईच्या डॉ. अश्विनी नाबर आणि दुसऱ्या उपविजेत्या मुंबईच्याच डॉ. पारणा ठक्कर ठरल्या. या सर्वांचा सन्मानचिन्ह देवून यावेळी गौरव करण्यात आला.