मुलभूत सुविधांचा वाळूज मध्ये अभाव...

ओरंगाबाद जिल्ह्यातील वाळूंजच्या सिडको भागत मुलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचे पाहायला मिळत आहे.

Update: 2023-02-24 08:30 GMT

औरंगाबाद जिल्ह्यातील सिडको वाळूंज महानगर-१ अंतर्गत एलआयजी आणि एमआयजी गृहनिर्माण योजनेतील जुनाट आमि निरुपयोगी झालेल्या ड्रेनेजलाईन्स तात्काळ बदलण्यात याव्यात आणि परिसरातील रहिवासीयांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी सिडको प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही सिडको प्रशासनाला जाग येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनला जाग येण्यासाठी ठाकरे गटाचे विभागप्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी सिडको कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

हे उपोषण सुरु होऊन आज चार दिवस पूर्ण होत आले असले तरी सिडको प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सिडको प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. यामुळे सिडको प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्याकडे सिडको प्रशासन जाणून-बुजून कानाडोळा करत असल्याचा आरोप दत्तात्रय वर्पे यांनी केला आहे. नागरिकाचा बळी घेतल्यानंतरच गेंड्याची कातडी पांघरलेल्या सिडको प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल दत्तात्रय वर्पे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

Tags:    

Similar News