बॅंक सुट्ट्या (Bank Holidays): फेब्रुवारीमध्ये बेसुमार सुट्ट्या; किती दिवस बॅंका राहणार बंद? पहा बॅंकेच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी.
या सुट्ट्या राज्य आणि त्याच्या सुट्ट्यांवर अवलंबून बदलू शकतात बँक सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने 3 आधारावर प्रकाशित केली आहे. ही यादी राष्ट्रीय आणि राज्यानुसार साजरी होणाऱ्या सुट्ट्यांवर आधारीत आहे.
अवघ्या काही दिवसात फेब्रुवारी महिना सुरु होईल. फेब्रुवारी महिन्यात बँकेमध्ये महत्त्वाचे काम करायचे ठरवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. फेब्रुवारीमध्ये काही दिवस बँका बंद राहणार आहेत. फेब्रुवारी सुरु होण्यापूर्वी किती दिवस बँका बंद राहतील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण बँक हा आपल्या दैनंदिन जिवनातील महत्त्वाचा भाग असून पैसे काढण्यापासून ते पैसे जमा करण्यापर्यंत अनेक कामे करण्यासाठी बँकेत जावे लागते. फेब्रुवारीमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 14 दिवस बँक सुट्ट्या आहेत. सुट्ट्या आणि विकेंडसाठी बँका नऊ दिवस बंद राहतील. त्याचवेळी हे वर्ष लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतील काही राज्यांमध्ये 14 दिवसांसाठी बँका बंद असून बँका फक्त 15 दिवस कामकाज चालू ठेवू शकतात. त्यामूळे बँकेत जाण्यापूर्वी बँकेच्या सुट्टीचे वेळापञक एकदा तपासून पहा.
या सुट्ट्या राज्य आणि त्याच्या सुट्ट्यांवर अवलंबून बदलू शकतात बँक सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने 3 आधारावर प्रकाशित केली आहे. ही यादी राष्ट्रीय आणि राज्यानुसार साजरी होणाऱ्या सुट्ट्यांवर आधारीत आहे.
फेब्रुवारी मधील बँक सुट्ट्यांची यादी:
4 फेब्रुवारी : रविवार
10 फेब्रुवारी: दुसरा शनिवार
11 फेब्रुवारी : रविवार
10-12 फेब्रुवारी: सिक्कीममध्ये लोसार सणासाठी सुट्टी पाळली जाते
14 फेब्रुवारी : हरियाणा, ओडिशा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये वसंत पंचमीच्या काळात बँका बंद राहतील.
15 फेब्रुवारी: लुई-नगाई-नी मणिपूर बँकेला सुट्टी.
18 फेब्रुवारी : रविवार
19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
20 फेब्रुवारी: मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये उत्सव
24 फेब्रुवारी : चौथा शनिवार
25 फेब्रुवारी : रविवार