हिंदूंच्या वस्तीत बांगड्या विकणाऱ्या मुस्लिम तरुणाला मारहाण?

Update: 2021-08-23 07:09 GMT

मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये बांगड्या विकणाऱ्या एका तरुणाला काहीजण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्यांपैकी एकजण त्या पीडित व्यक्तीला हिंदूंच्या वस्तीत यायचे नाही, अशी दमबाजी करताना दिसत आहे. याप्रकरणी इंदोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता या व्हिडिओमधील मारहाण करणाऱ्या लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई कऱण्यात येणार आहे, या प्रकरणात कुणावरही अन्याय होणार नाही, कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.


हा व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशचे काँग्रेस नेते इम्रान प्रतापगडी यांनी ट्विट करत मध्य प्रदेश सरकारला जाब विचारला आहे, " ये वीडियो अफगानिस्तान का नहीं बल्कि आज इंदौर का है, @ChouhanShivraj जी के सपनों के मध्यप्रदेश में एक चूड़ी बेंचने वाले मुसलमान का सामान लूट कर सरेआम भीड़ से लिंचिंग करवाई जाती है । @narendramodi

जी क्या यही भारत बनाना चाहते थे आप ? इन आतंकियों पर कार्यवाही कब ?

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंदोरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान त्या पीडित बांगडीवाला हा हिंदू असल्याचा बनाव करुन बांगड्या विकत होता, त्याच्याकडे दोन आधारकार्ड आढळून आले आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

गृहमंत्र्यांच्या या विधानावरुन आता जोरदार टीका होते आहे. तो हिंदू नावाने बांगड्या विकत होता, खोटे आधारकार्ड बनवले होते, हे सत्य मानले तरी त्याला शिक्षा देण्याचा अधिकार कुणाला आहे, कायदा हातात घेणाऱ्या त्या टोळक्यावर कारवाई होणार का असा सवालही काही नेटवकऱ्यांनी मध्य प्रदेश सरकारला विचारला आहे.

Similar News