निखील वागळे यांनी RSS चं केलं अभिनंदन
देशात हर घर तिरंगा अभियान राबवलं जात असताना RSS च्या डीपीला तिरंगा का नाही? असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जात होता. मात्र अखेर RSS च्या डीपीला तिरंगा लावण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त हर घर तिरंगा अभियान राबवण्यासाठी आवाहन केले आहे. त्यानुसार या अभियानाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असतानाच भाजपची मातृशाखा असलेल्या RSS च्या मुख्यालयावर तिरंगा कधी फडकवला जाणार? असा सवाल केला जात होता. मात्र आता RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मुख्यालयावर तीन दिवस तिरंगा फडकवण्यात येणार आहे. त्यानुसार शनिवारी मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय स्वयंस्वेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तिरंगा ध्वज फडकवला. तसंच RSS च्या फेसबुक आणि ट्वीटरचा प्रोफाईल फोटो बदलून त्याठिकाणी संघाच्या भगव्या ध्वजाऐवजी तिरंगा ध्वज ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या मागणीनंतर RSS ने मुख्यालयावर ध्वज फडकवल्याची चर्चा रंगली आहे.
RSS ने मुख्यालयावर ध्वज फडकवल्यानंतर आणि फेसबुक प्रोफाईल बदलल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, रा.स्व.संघाने इतिहासात पहिल्यांदाच फेसबुक आणि ट्वीटरच्या डीपीला तिरंगा ध्वज लावला आहे. या परिवर्तनाबद्दल अभिनंदन, असं म्हटलं आहे.
RSS ने मुख्यालयावर तिरंगा फडकवल्यानंतर म्हटले आहे की, स्वाधिनता का अमृत महोत्सव मनाएँ, हर घर तिरंगा फहराएँ, राष्ट्रीय अभिमान जगाएँ, असं म्हणत व्हिडीओ ट्वीट केला आहे.
यावर हितेंद्र पिठडिया यांनी प्रतिक्रीया देतांना म्हटले आहे की, आरएसएसकडे स्वतंत्र्यता आंदोलनादरम्यानची गोळवळकर, हेडगेवार किंवा सावरकर याचा तिरंगा घेतलेला फोटो आहे का?
एनएसयुआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांनी ट्वीटला कोट करून म्हटले आहे की, 52 वर्षानंतर का होईना पण तिरंग्याचे महत्व समजले. फक्त दाखवण्यासाठी आणइ सरकारची जाहीरात करण्यासाठी तिरंगा फडकवला. मात्र तिरंग्याला मनापासून कधी स्वीकारणार? असा सवाल केला आहे.