विधिमंडळ पावसाळी अधिवेशन आता समाप्तीच्या दिशेने जात असून शेवटच्या तीन दिवसांमध्ये जास्तीत जास्त विधेयक आणि अशासकीय कामकाज उरकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मनोहर भिडे यांच्या महापुरुषांच्या बदनामीकारक वक्तव्यानंतर विधानसभेत कारवाईची मागणी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार यशोमती ठाकूर यांना आलेल्या धमकीचे पडसाद आता विधिमंडळात उमटत आहेत आज सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाने विधिमंडळाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी करत भिडेंवर कारवाईची मागणी केली. प्रश्नोत्तराच्या तासाबरोबरच लक्षवेधी आणि शासकीय अशासकीय विधेयकांचा कामकाजात समावेश आहे.. पहा आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्यासोबत विधिमंडळाचे तिसरे सभागृह...