आर्यन खानचा मुक्काम आर्थर रोड जेलमधेच ः जामीनावरील निकाल २० ऑक्टोबरला
गेली दहा दिवस जामीनासाठी वेगवगेळ्या कोर्टात प्रयत्न करणाऱ्या बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या जामीनावर निकाल २० ऑक्टोबर पर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय विशेष एनडीपीएस न्यायालयाने दिला.;
आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या जामीन अर्जांवर आज सर्व बाजूंनी सुनावणी पार पडली. अखेर न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी निर्णय राखून ठेवत २० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केलं.
आर्यन खानने सतिश मानशिंदे यांच्याकडून आता केस अमित देसाई यांच्याकडे दिली आहे. अनेक तात्विव कायदेशीर मुद्दे आणि यापुर्वीच्या खटल्याचे निकाल दोन्ही पक्षाकडून न्यायालयापुढे मांडण्यात आले. एनसीबीकडून अनिल सिंग म्हणाले, आर्यन खान तरुण आहेत म्हणून त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला हवं याविषयी मी सहमत नाही. आपला देश महात्मा गांधी, गौतम बुद्धानी दिलेल्या तत्त्वांवर उभा आहे. एनसीबी ड्रग रॅकेटची पाळेमुळे खणण्याच्या प्रयत्नात आहे. तपास सुरू आहे. त्यामुळे या टप्प्यावर आरोपींना जामीन मंजूर करू नये अशी मागणी केली.
कोणत्याही देशाचा विकास सुदृढपणे व्हायला हवा यात वाद नाही. नागरिक म्हणून आणि कोर्टाचा अधिकारी म्हणूनही सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहण्याचा मीही विचार करतो. यात वाद नाही. पण त्याचवेळी हेही तेवढेच महत्त्वाचे आहे की, आपण घटनेसाठी, नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी लढलो आणि देशाचे स्वातंत्र्य मिळवले. त्यामुळे तपास यंत्रणा जेव्हा सामाजिक संकटावर मात करण्यासाठी पावले उचलते तेव्हा त्यांनी राज्यघटना आणि कायद्यातील तरतुदींचे पालन करणेही अपेक्षित आहे असं अमित देसाई म्हणाले.
एनसीबीकडून आर्यन आणि त्याच्या सहकाऱ्यांना जामीन देऊ नये अशी जोरदार मागणी केली. तर आर्यन आणि इतराकंडून व्हाट्सअप चाट आणि आंतराष्ट्रीय रॅकेट मधील सहभाग हास्यास्पद असल्यानं तातडीने जामीन मंजूर करण्याची मागणी केली. कोर्टानं दोन्ही बाजू ऐकुण घेतल्यानंतर २० ऑक्टोबर पर्यंत कोर्टाचा जामीनावरील निर्णय राखून ठेवण्याचा निर्णय दिला.