आर्यन खानचा ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडीत मुक्काम...
आर्यनला जेल होणार की बेल मिळणार? यावर दोन्ही बाजूनं जोरदार प्रतिवाद झाल्यानंतर मुंबई किल्ला कोर्टानं अभिनेता शाहरुख यांचा पुत्र आर्यन खान आणि इतर दोघांना ७ ऑक्टोबर पर्यंत NCB कोठडी देण्याचा आदेश दिला आहे.
२ ऑक्टोबर रोजी मुंबईतून प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याबद्दल NCB ने मोठी कारवाई केली होती. यामधे अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा देखील सापडला होता. रविवार सुटीच्या कोर्टात पेश केल्यानंतर आर्यन आणि त्याच्या साथीदारांना एका दिवसाची NCB कोठडी देण्यात आली होती. आज कोठडी संपल्यानंतर पुन्हा मुंबईच्या किल्ला कोर्टात आणण्यात आलं. व्हाट्स चाटच्या माध्यमातून आर्यन आणि त्याचे सहकारी अनेकांच्या संपर्कात असल्यानं चौकशीसाठी ११ ऑक्टोबर पर्यंत कोठडी देण्याची मागणी NCB कडून करण्यात आली.
कोर्टात आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. तर दुसरीकडे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे एनसीबीकडून बाजू मांडली. तर, आर्यन खानच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक फोटो स्वरूपातील माहिती आढळल्याचे समोर आल्याने, त्याच्या कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली जावी, अशी मागणी यावेळी एनसीबीकडून करण्यात आली होती.
कोणत्याही प्रकारे आर्यनकडे अमलीपदार्थ सापडले नाही. त्याने प्रवासी जहाजावर अमली पदार्थाची खरेदी विक्री केलेली नाही. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने तात्काळ आर्यनची सुटका करावी अशी मागणी सतीश मानशिंदे यांनी कोर्टाकडे केली होती. दरम्यान एनसीबीचे अधि्कारी वकिलांना आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची माहीती देखील कोर्टानं घेतली .त्यानंत सर्व गुन्हे अजामीनपात्र असल्याचे सांगत आर्यन खानसह इतर दोन्ही आरोपींना ७ ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे.
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती.