#BreakingNews आर्यन खानला NCB कडून क्लिनचिट; आरोपपत्रातून नाव वगळलं

Update: 2022-05-27 09:20 GMT

गतवर्षी माध्यमांच्या केंद्रस्थानी असलेल्या कॉर्डेलिया क्रूझ प्रकरण आता थंडावले असून या प्रकरणातील आरोपी अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यन खान (Aryan Khan)ला एनसीबीने क्लिनचिट दिली आहे. एनसीबीने कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खानचं नाव वगळण्यात आलं असून आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ आढळले नाहीत. त्यामुळे एनसीबीकडूनच त्याला क्लिनचिट देण्यात आलेली आहे. गतवर्षी 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर एनसीबीने कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 26 दिवसांनी आर्यन खान (Aryan Khan) याला जामीन मिळाल्यावर आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) सुटका झाली. मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता.

या प्रकरणी बरेच आरोप- प्रत्यारोप देखील झाले होते यानंतर एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या अहवालानुसार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते. तसेच आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही असंही तपासात समोर आलं आहे. एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटी म्हणजेच विशेष चौकशी समितीने चौकशीअंती हा निष्कर्ष काढला होता. आर्यन खानच्या (Aryan Khan) प्रकरणात एक मोठा खुलासा एनसीबीकडून करण्यात आला आहे. आर्यन खान आणि त्याच्यासोबतच्या सहा आरोपींचं नाव आरोपपत्रातून वगळण्यात आलेलं आहे. कारण त्यांच्याकडे ड्रग्ज असल्याचे कोणतेही सबळ पुरावे आढळून आलेले नाहीत. या सहा जणांकडे कोणताही अंमली पदार्थ सापडला नाही, पण त्यांच्यासोबतच्या मित्रांकडे हे पदार्थ सापडले होते, तेवढ्यावरून या लोकांना अटक करण्यात आली होती.

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनसीबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितलं आहे. तसेच या ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळ्यात आली आहे

पण जेव्हा हा तपास एसआयटी (SIT Committee of NCB) कमिटीकडे गेला, त्यावेळी या सहा जणांकडे कोणतेही अंमली पदार्थ आढळले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असं सांगत एनसीबीने (Narcotics Control Bureau) त्यांना क्लिनचिट दिली आहे. मात्र उर्वरित १४ जणांवर आज पहिलं आरोपपत्र दाखल कऱण्यात आलं आहे.

पुरावे न मिळाल्याने आरोपपत्रातून वगळण्यात आलेले ६ जण कोण?

१. आर्यन खान

२. अविन शुक्ला

३. गोपाल आनंद

४. समीर साईघन

५. भास्कर अरोरा

६. मानव सिंघल

Full View

Tags:    

Similar News