Aryan Khan Drugs Case: सुनील पाटील नाही तर चौधरी, अनिल गोटेंचं मोहित कंबोज यांच्या आरोपांना उत्तर
आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा खरा सूत्रधार हा धुळे येथील सुनील पाटील असल्याचा आरोप भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांनी केला होता. त्याला धुळे येथील राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हटलंय गोटे यांनी?
संपूर्ण राज्यभरात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील धुळ्यातील सुनील पाटील यांचा राष्ट्रवादीशी कुठलाही संबंध नसून 2012-13 साली त्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे सुनील पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे कुठलेही संबंधित नसून राष्ट्रवादी पक्षातील लोकांच्या संपर्कात असतील. मात्र, ते पक्षाचे नाहीत, स्वतःच्या अंगावर यायला लागल्यावर भाजपाने त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध जोडला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.