पश्चिम बंगालमध्ये अँटी रेप बिल मंजूर, महाराष्ट्रात शक्ती विधेयकाचं काय ?
कोलकाता येथील ८ ऑगस्टच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच अडचणीत सापडल्या होत्या. अशा घटना रोखण्यासाठी आज पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेत अँटी रेप बिल म्हणजेच अपराजिता महिला आणि बाल विधयेक २०२४ मंजूर केले आहे. या विधेयकाअंतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद तर पीडितेचा मृत्यू झाल्यास थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुंदा प्रमिला, ऍड. रमा सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के यांच्याशी चर्चा केलीय.