आज फिर एक बिल्लीने दहाडने की कोशिश की है- अमृता फडणवीस

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर विरोधकांची टीका;

Update: 2022-02-15 12:46 GMT

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. तर संजय राऊत भाजपच्या साडेतीन नेत्यांची नावे जाहीर करणार होते. मात्र संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत भाजपच्या साडेतीन नेत्यांची नावे सांगण्यात आले नाहीत. त्यामुळे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. तर आज फिर एक बिल्लीने दहाडने की कोशिश की है, अशी प्रतिक्रीया अमृता फडणवीस यांनी केली आहे.

भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भाजपचा बुरखा फाडणार, असे संजय राऊत यांनी सांगितले होते. मात्र उत्सुकता लागलेल्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत विशेष काहीच नसल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत आज फिर एक बिल्लीने दहाडने की कोशिश की है, असा टोला संजय राऊत यांना लगावला.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत मोठा बाँब फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत भाजपच्या साडेतीन नेत्यांची नावे जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामुळे राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर टीका करताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक ट्वीट केले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार घेतल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. यावेळी नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हटले की, चाटायची असेल तेव्हा पवार साहेब, चावायचं असेल तेव्हा बाळासाहेब. यालाच म्हणतात लोंबत्या राऊत.


Tags:    

Similar News