राजभवनातील (rajabhavan)शपथविधी कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अमोल कोल्हे अजित पवारांसोबत(ajit pawar) गेले असल्याच्या बातम्यानंतर स्वतः अमोल कोल्हे (amol kolhe)यांनीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्वीट tweet करत मी साहेबांसोबत असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. याच ट्वीट मध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये काहीही झालं तरी बाप बदलायचा नाही असे वाक्य आहे. अमोल कोल्हे यांच्या यांचे ट्वीट राष्ट्रवादी (Ncp)साठी दिलासा असून आणखी काही आमदार परतणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी केली होती. यानंतर कोणते आमदार परतणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.