महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर खा. प्रीतम मुंडे यांचा मोदी सरकारला घराचा आहेर
या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता अशी स्पष्ट भूमिका प्रितम मुंडे यांनी घेतली.
बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला खेळाडूंशी संबंधित प्रश्नावर बोलताना खा. मुंडे यांनी 'केवळ खासदारच नाही तर, एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, यातील सत्य समोर यायला हवे होते. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणी गेले नाही. त्या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी' असे खा. मुंडे म्हणाल्या. एका भाजप खासदारांनी घेतलेली त्यामुळे याची चर्चा होत आहे.
सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देणे हा शेतकऱ्यांचा सन्मान नाही मोदींच्या योजनेवर खासदार प्रीतम मुंडे यांनीच प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या "6 हजार रुपये देणे हा शेतकऱ्यांचा सन्मान नाही. आज पिकाची जी अवस्था आहे, ती निसर्गाने होणाऱ्या आपत्तीमुळे, जागतिक मार्केटवर परिणाम होत आहेत. अस म्हणतं पुन्हा एकदा सरकारला टोला लगावला.
मुंडे यांना त्यांची चुक लक्षात येतात त्यांनी वाक्यात सारवासारव करण्याची सुरवात केली त्या म्हणाल्या त्यामुळे शेतीमालाचा भाव घसरला आहे. यात दोष फक्त केंद्र सरकारचा नाही. जे शेतकरी थकलेले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. फक्त शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी आम्ही काम केलं. दरम्यान त्यांचा सन्मान व्हावा म्हणून 6 हजार घ्या आणि गपचूप बसा. त्याचा अर्थ होत नाही. असं म्हणत आपली चूक झाल्याचं लक्षात सारवा सारव देखील केली.