मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची मोक्याची जागा लाटण्याचा डाव, बचाव समितीचा आरोप...

मुंबईतील मराठी अस्मितेचे प्रतीक असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाबाबत गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Update: 2021-01-14 11:19 GMT

मुंबईचे सांस्कृतिक केंद्र म्हणून मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाकडे पाहिलं जातं. मराठी मनाची अस्मिता म्हणजे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय. पण याच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप "मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव कृती समितीने केला आहे. तसंच संस्थेत संशयास्पद कारभार सुरू आहे, याची सखोल चौकशीची मागणीदेखील कृती समितीचे सुधीर हेगिष्टे यांनी केली आहे.

एक चांगला उपक्रम म्हणून मुंबई महापालिकेने अनेक ठीकाणी यासाठी जागाही दिल्या. मात्र अशा मोक्याच्या जागांवर टोलेजंग इमारती उभारल्या जातील अशी भीती बचाव समितीकडून व्यक्त केली जात आहे. ग्रंथ संग्रहालयाच्या ४४ शाखांपैकी २९ शाखा उरल्या आहेत. शाखा वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिकांचा समावेश असलेली "मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव कृती समिती" स्थापन करण्यात आली आहे. शंभर वर्षे जुनी ही संस्था टिकायला हवी. मराठी शाळा, मराठी ग्रंथसंपदा वाचविण्यासाठी एकत्रित पुढाकार घेणे आवश्यक आहे. मोक्याची जागा, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार या सर्व मुद्दय़ांवर ग्रंथालय बचाव कृती समितीचे प्रमुख निमंत्रक सुधीर हेगिष्टे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी......


Full View


Tags:    

Similar News