अदानींची घसरण, शेअर बाजार पुन्हा आपटला

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर सावरलेल्या अदानींची पुन्हा एकदा दाणादाण उडाली आहे.;

Update: 2023-02-09 05:30 GMT

हिंडेनबर्गने (Hindenberg) अदानी समुहावर (Adani Group) केलेल्या आरोपानंतर भारतीय शेअर बाजारात (BSE) अदानी समुहाची सुरु असलेली दाणादाण सुरुच आहे. त्यातच बुधवारी सावरलेला बाजार गुरुवारी सुरु होताच मोठ्या प्रमाणावर घसरल्याचे दिसून आले.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समुहाच्या सर्वच कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. मात्र बुधवारी अदानी समुहाचे शेअर काही अंशी वधारले होते. मात्र गुरुवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताच अदानी एन्टरप्रायजेस (Adani Enterprises) कंपनीच्या शेअर्समध्ये 14.99 टक्के घसरण झाली आहे. अदानी पोर्ट (Adani Port) कंपनीच्या शेअर्समध्ये 6.95 टक्यांची घसरण झाली आहे. अदानी ट्रान्समिशनमध्ये (Adani Transmission) 5 टक्यांची तर अंबुजा सिमेंटमध्ये 6.17 टक्क्यांची, अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) 5 टक्के, अदानी पावरमध्ये (Adani Powers) 5 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) 4.27 टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे अदानी समुहाला मोठा दणका बसला आहे.




 


Tags:    

Similar News