केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरच्या प्रश्नावर लोकसभेत निवेदन दिले. यावेळी काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी काश्मीरमध्ये सर्वपक्षीय मंडळाला जाण्यास परवानगी का दिली जात नाहि, असा सवाल विचारला. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीय मंडळाला जाण्यापासून रोखलेले नाही. फक्त ३७० कलम हटवले तेव्हा रोखण्यात आले होते, कारण त्यावेळी वाद आणखी भडकवण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता, असा आरोपही शाह यांनी केला.