वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूकांसाठी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूका कधीही लागू शकतात यासाठी वंचित आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की "अकोला मतदारसंघातून मी स्वतः निवडणूक लढवणार आहे.
भाजप,आरएसएस यांच्या उमेदवाराला पराभूत करून आपण निवडणूका जिंकणार असल्याचा विश्वास, व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की "देशातील परिस्थिती बदलायची असेल तर भाजपचा पराभव केलाच पाहिजे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा असं सर्व मतदारांना प्रकाश आंबेडकर यांनी केलं आवाहन