Mumbai : राज्याचं अंतरीम अर्थसंकल्प ( Interim Budget ) अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ हे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु राहणार आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार. त्यामुळे सरकार कडून नव्या घोषणा काय होणार विरोधकांसह राज्याचं लक्ष लागलं आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अजित पवार आपल्या अर्थ संकल्पातून कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत पुरणी मागणीवर चर्चा होणार आहे. आणि त्या नंतर दुपारी 2 वाजता अजित पवारांकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.