UP Election : असदुद्दीन ओवैसींच्या गाडीवर गोळीबार
पाच राज्यांच्या निवडणूकीची धुम सुरू आहे. त्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र गुरूवारी असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पाच राज्यांच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपांची धुम सुरू आहे. तर उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच AIMIM चे संस्थापक आणि खासदार असुद्दीन ओवैसी यांनीही उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली. आहे. तर गाझियाबाद जिल्ह्यातील छजारसी गावात असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.
उत्तरप्रदेशसह पाच राज्यात निवडणूकांची धुम सुरू आहे. त्यातच उत्तरप्रदेशात आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. तर AIMIM पक्ष उत्तरप्रदेशात जोरदार तयारीने उतरला आहे. याबरोबरच असदुद्दीन ओवैसी यांच्या सभांना मोठी गर्दी जमत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे असदुद्दीन ओवैसी यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातच असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर असदुद्दीन ओवैसी यांनी याबाबत ट्वीटरवरून माहिती दिली.
यावेळी ट्वीट करत ओवैसी म्हणाले की, काही वेळापुर्वी 3-4 लोकांनी छिजारसी टोल नाक्याजवळ माझ्या गाडीवर गोळीबार केला. त्यानंतर गोळीबार करणारांनी हत्यार टाकून पळ काढला. त्या फायर केलेल्या गोळ्यांमुळे माझी गाडी पंक्चर झाली. मात्र मी सुखरूप आहे. त्यामुळे मी दुसऱ्या गाडीत बसून पुढील प्रवासासाठी रवाना झालो, अशी माहिती असदुद्दीन ओवैसी यांनी दिली.
पाच राज्यांच्या निवडणूकीची धुम सुरू असताना संसद सदस्यावर हल्ला होणे अत्यंत गंभीर असून राजकारणाची पातळी घसरत चालली आहे का? असा सवाल केला जात आहे. तर ओवैसींच्या गाडीवर हल्ला झाल्याने पत्रकार सुचेता दलाल यांनी ओवैसी यांचे ट्वीट कोट करत म्हटले की, देवा.. आम्ही कोणत्या दिशेला जात आहोत? कायदा सुव्यवस्था कुठे आहे? , असा सवाल केला.