AI मध्ये जातीभेद संपवण्याची क्षमता, तज्ज्ञांनी व्यक्त केले मत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त AI तज्ज्ञांना एकत्र आणण्यात आले होते. यावेळी AI मध्ये जातीसह सर्व सामाजिक भेदभाव दूर करण्याची क्षमता असल्याचे आंतरराष्ट्रीय मंचावरून दिलीप म्हस्के यांनी म्हटले आहे.;

Update: 2023-04-16 11:28 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar jayanti) यांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने भारतातील भारतीय मिशनने फाऊंडेशन फॉर ह्युमन होरायझनसह जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय दूर संचार संघ, एआय फॉर गुड सिंगापूर येथील AI तज्ज्ञांना एकत्र आणून AI फॉर सोशल जस्टिसवर वर चर्चा करण्यात आली.

यावेळी असुरक्षित समुदायांचा समावेश करण्यासाठी अनुयायांना जगभरातील प्रशासन मंच स्थापन करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले. तसेच आंबेडकरी अनुयायांना जगभरातील AI चळवळीचे नेतृत्व करण्यास प्रवृत्त करणारा हा पहिलाच उपक्रम असेल, असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.

भारतीय मिशनच्या (Indian mission) राजदूत रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित आणि सामाजिक न्याय ही पंतप्रधान मोदी सरकारची प्रमुख जबाबदारी असल्याचे सांगितले. त्याबरोबरच दिलीप म्हस्के यांना आंबेडकरवाद्यांनाचा समावेश करण्यासाठी जागतिक व्यासपीठ तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

उपेक्षित समुदायातून लोक येत नसतील तर AI चळवळ मानवतेला बदलणार नाही. त्यामुळे आंबेडकरवाद्यांसारख्या सर्वात असुरक्षित समुदायासाठी जागतिक आरोग्य संघटनेची वचनबध्दता असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला.

AI च्या माध्यमातून जातिव्यवस्थेचे उच्चाटन करण्याबाबत त्याचा दीर्घकाळ प्रभाव पडेल, असा विश्वास या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

दिलीप मोंडल (Dilip Mondal) एक प्रसिध्द दलित पत्रकार आहेत. त्यांनी कार्यक्रमाच्या मध्यभागी आंबेडकरी अनुयायी असण्यावर लक्ष केंद्रीत केले. ख्रिसमस साजरे करताना UN ख्रिश्चन, ईदच्या वेळी मुस्लिम नेतृत्वाला तर वैशाखाच्या वेळी शीख आणि वेसाखच्या वेळी बौध्द उत्सव साजरा करताना निर्बंधांसह आणि आंबेडकरवाद्यांची छाणणी करून आयोजित केला जाऊ नये, असंही मत या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.

दिलीप म्हस्के यांनी संयुक्त राष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हावी, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पाठपुरावा केला. त्याबद्दल म्हस्के यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. त्याबरोबरच आगामी काळात AI जाती आणि इतर कोणत्याही प्रकारचा भेदभाव संपवू शकते, असा विश्वास यावेळी दिलीप म्हस्के यांनी व्यक्त केला.

Tags:    

Similar News